कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळतेय. मालिके प्रमाणे मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. तर मालिकेत अंतरा ही मुख्य भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण साकारतेय. योगिता सोशल मिडियावर चांगलीच सक्रीय असते. मालिकेचे सेटवर ती बरीच धमाल आणि मजा मस्ती करताना पाहायला मिळत असते. नुकताच एक रिल तिने तिच्या सोशल मिडियावर शेअर केलाय. या रिलमध्ये तिच्यासोबत मालिकेतील तिच्या सहकलाकार अभिनेत्री श्वेता कुलकर्णी, प्राजक्ता नवनाळे, मिलीशा जाधव, मिलन डिसूजा देखील पाहायला मिळायेत. या रिलमध्ये या सगळ्या ‘झल्ला वल्ला’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळायेत. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना पाहायला मिळतायेत.
snehalvo
#JivMajhaGuntala #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber